
तरोडा येथील कार अपघात.
वैद्य कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर.
तीन फैऱ्या झाडून पोलिस दलाने दिली सलामी.
वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील मांडगाव येथे रामनवमी निमित्ताने असलेल्या महाप्रसाद घेऊन आपल्या कुटुंबासह कारने वर्ध्याकडे निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार समोर रानडुक्कर आडवा आल्याने कार अनियंत्रित होऊन कार ट्रंकरवर जाऊन धडकली. या भिषण अपघात पोलीस कर्मचाऱ्यासह पती, मुलगा, मुलगी या चौघाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत मधुकर वैद्य वय ४३ वर्ष राहणार मांडगाव हल्ली मुक्काम वर्धा हे आपल्या मांडगाव गावात रामनवमी निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी महाप्रसाद घेऊन त्यांच्या कर्तव्यावर व मुलाची परीक्षा असल्याने ते रात्री आपल्या कार क्रमांक MH40 KR3603 ने मांडगाव वरून वर्धा जाण्यास निघाले. या मार्गाने जात असताना तरोडा-साखरा पार्टी दरम्यान कार समोर अचानक रानडुक्कर आडवे आल्याने रानडुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे कार वरील नियंत्रण सुटून कार अनियंत्रित होऊन समोरून येणारा टँकर क्रमांक MH09CV2185 ला जाऊन धडकली. या भिषण अपघात पत्नी प्रियंका प्रशांत वैद्य वय ३७ वर्ष व मुलगा प्रियांश प्रशांत वैद्य वय ८ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत मधुकर वैद्य वय ४३ वर्ष व त्यांची मुलगी माही प्रशांत वैद्य वय ३ वर्ष हे गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी वाहनाने कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मुलगी माही हिला तपासून मृत घोषित केले तर प्रशांत वैद्य डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूमध्ये होल पडले होते त्यामुळे नागपूर येथे रवाना केले असता त्यांचा मृत्यु झाला एकाच परिवारातील चारही सदस्याच्या असा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने मृतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी मांडगावात तोबा गर्दीच झाली होती. या घटनेमुळे मांडगावावर शोककळा पसरली. या घटनेने मांडगावात चूलच पेटली नाही. वैद्य परिवारातील चारही मृतांचे पार्थिव मांडगाव येथे मंगळवारी 8 एप्रिल रोजी दुपारी 3.15 वाजता आणण्यात आले. त्यानंतर चारही पार्थिव वर्धा येथील वैद्य यांच्या प्रतापनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. या ठिकाणाहून अंत्ययात्रा काढून चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन तिरड्यांवर निघाली चौघांची अंत्ययात्रा.
मांडगाव येथून प्रशांत वैद्य, प्रियंका वैद्य, माही उर्फ मनश्री वैद्य, प्रियांस वैद्य यांचे पार्थिव वर्धा येथील प्रतापनगर निवासस्थानी आणले. याच ठिकाणाहून दोन तिरडांवर संबंधित चौघांची अंत अंत्ययात्रा काढली. आईच्या तिरडीवर मुलगी तर वडिलांच्या तिरडीवर मुलाचे पार्थिव होते. वर्धा येथील मोक्षधामात या चौघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंतयात्रे दरम्यान भावाचा आक्रोश
अपघातात मृत्यू झालेल्या चारही जणांचे पार्थिव वैद्य यांच्या वर्धा येथील प्रताप नगर भागातील निवासस्थाने आणण्यात आले. याच ठिकाणाहून अंत्ययात्रा काढण्यात. आले अंत्ययात्रे दरम्यान प्रशांत चा मोठा भाऊ भूषण वैध यांनी आक्रोश केला.
प्रशांत वैद्य होते वडनेर पोलिस ठाण्यात कार्यरत.
कार अपघातातील मृतक प्रशांत वैद्य हे वडनेर पोलिस ठाण्यात बिट जमादार म्हणून कार्यरत होते. मनमिळावू स्वभावाचे असलेले त्यांचे वर्धा जिल्ह्यात त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्या या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे धाव घेतली.
तीन फैऱ्या झाडून पोलिस दलाने दिली सलामी.
चारही जणांचे अंत्ययात्रा वर्धा येथील मोक्षधामात आल्यावर वर्धा पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैन्या झाडून पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य व प्रशांतची पत्नी प्रियंका, मुलगा प्रियांश, मुलगी माही यांना पोलिस विभागातर्फे सलामी देण्यात आली.यावेळी आमदार राजेश बकाने, माजी सभापती मिलिंद भेंडे, पोलिस उपअधीक्षक (गृह) मटकर, हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित तसेच कर्मचारी व गावकरी आदींची उपस्थिती होती.