*छात्रावास येथील विद्यार्थ्यांना बुक व पेन देत दोषहरराव फाये यांचा केला वाढदिवस साजरा*
*कोरची : -* आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव तथा माजी कृषी उत्पन बाजार समिती संचालक व माजी उपसरपंच सुवर्णकार दोषहरराव मोरेश्वर फाये यांच्या ६५ व्या वाढदिक्याचे औचित्य साधुन श्रीराम विद्यालय येथील संपूर्ण कर्मचारी वर्गाने कोरची येथील केशवछात्रावास येथील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन देऊन वाढदिवस साजरा केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य नंदूजी गोबाडे होते., तर प्रमुख अतिथी म्हणून सुरज हेमके, रमेश देशमुख, होते. सदर कार्यक्रम व प्रसंगी श्रीराम विद्यालय येथील कर्मचारी राजू ठाकरे, प्रकाश बांडे, हेमंत भुसारी, देवदास हटवार, महेंद्र बाविस्कर, रवींद्र वलथरे, रवी भानारकर, सत्यवान मेश्राम, पुरुषोत्तम बावणे, कु. सुषमा खोब्रागडे, गौरी देशमुख, हरिश्चंद्र डोमळे, चुमेन नैताम, ज्ञानेश्वर मोहुर्ले. आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन राजूजी ठाकरे तर आभार प्रकाश बांडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम विद्यालय येथील संपूर्ण शिक्षकांनी सहकार्य केले.
