पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता रीना गावडे यांची उमेदवारी चर्चेत.
अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच ग्रामीण भागात आतापासूनच निवडणुकीचे तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. पेरमिली – राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षण जाहीर झाल्याने अनेक पक्षाचे कार्यकर्ते महिलांच्या शोधात लागल्याचे चित्र आहे.
पेरमिली- राजाराम जिल्हा परिषद मतदारसंघात माजी मंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे कट्टर कार्यकर्ते तसेच युवा नेते संदीप इरपा गावडे यांच्या सौभाग्यवती रीना संदीप गावडे यांची जिल्हा परिषद करिता उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे. पल्ले येथील रहिवासी असलेले संदीप गावडे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून पेरमिली- राजाराम परिसरात त्यांची चांगली ओळख आहे.
नुकत्याच पार पडलेल्या काही स्थानिक बैठकींमध्ये त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून जनतेच्या मनात असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो.अनेक युवक आणि महिला वर्गाने त्यांना खुले पाठबळ जाहीर केले आहे. राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.त्यांची उमेदवारी गंभीरपणे घेतली जात असून,स्थानिक पातळीवर नवा पर्याय म्हणून भाजपाकडून रीना संदीप गावडे यांचे नाव पुढे येत आहे.
आगामी काळात अधिकृत उमेदवारी जाहीर झाली तर, पेरमिली- राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रात ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
