बैठकीमध्ये एक मताने घेण्यात आले निर्णय.
गडचिरोली:- डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी स्वयंपाकी महिलांना तुटपुंजे 1 हजार रुपये मानधन मिळते. या मानधनात कुटुंबांचा उदरनिर्वाह करने कठीण आहे. त्यामुळे स्वयंपाकी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, याकरिता सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकिरता आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद व विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा निर्णय नुकतीच आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये डा.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत काम करणा-या आंगनवाड़ी स्वयंपाकी महिलांनी एकमताने घेतला आहे. बैठकीमध्ये वर्षभर केलेल्या कामाचा अहवाल वाचन करण्यात आला. यामध्ये मागील एक वर्षांपासून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री यांना धरने आंदोलन व प्रत्यक्ष मुलाखतीतून निवेदन देण्यात आले. निरंतर मानधन वाढीची मागणी करुन सुध्दा मानधन वाढत नसल्यामुळे वर्षभर केलेल्या कामगिरीचा व संबंधित अधिकारी व मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनांचा आढावा घेण्यात आला. डा.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनांतर्गत कार्यरत आंगनवाडी स्वयंपाकी महिलानी सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने करुन संबंधित अधिकारी व मंत्री यांना निवेदन दिली. मात्र सरकार व प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे डा.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत कार्यरत आंगनवाड़ी स्वयंपाकी महिला यांनी आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद व विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा निर्णय नुकतीच पार पडलेल्या सभेच्या माध्यमातून घेतला आहे.
यावेळी अमृत आहार आंगनवाडी स्वयंपाकी महिला संगठन प्रमुख कृष्णा चौधरी, दिपाली बावनथडे, अंजू गेडाम, रसिका नरोटे, गीता उईके, कल्पना गायकवाड, वैशाली मडावी, वैशाली नरोटे, अश्विनी गुरनुले, सरिता गावळे, लक्ष्मी कुमोटी, संध्या गुरनुले, ललीता डोंगरवार, शकुंतला घुगुसकर, सीमा गोटे आदि कुरखेड़ा, कोरची, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, चामोर्शी, वडसा येथील आंगनवाड़ी स्वयंपाकी महिला उपस्थित होते.