दारव्हा तालुक्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; भरारी पथकाचे दुर्लक्ष.
जया लाभसेटवार
उपसंपादिका यवतमाळ
यवतमाळ:- यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गॅस सिलेंडर चा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात १६ भरारी पथके स्थापन केली. गॅस सिलिंडर चा काळाबाजार करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश पण दिले. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात सध्या एलपीजी गॅसचा प्रत्यक्ष तुटवडा निर्माण झाला नसला, तरी भविष्यात तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. तालुक्यात विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलेंडर काही ठिकाणी व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही ठिकाणी जादा दराने गॅस विक्री होत असल्याचीही माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक तयार करून तालुक्यातील हॉटेल, ढाबे, चहा टपऱ्या व इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करत कारवाई सुरू केली आहे.
गॅस वितरण सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, नागरिकांनी काळाबाजार करणाऱ्यांची माहिती दिल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
दारव्हा तालुक्यातील तरोड्यात गॅस सिलेंडर मिळेना!
जिल्ह्यात गॅस सिलिंडर चा गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६ भरारी पथके तैनात केली असले तरी दारवा तालुक्यातील तरोडा येथे गॅस सिलेंडरचा आठ दिवसापासून तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे भरारी पथकाने लक्ष देण्याचे गरज असल्याचे येथील नागरिकाकडून बोलले जात आहे.
नियमबाह्य प्रकार आढळल्यास कठोर कारवाई:- राजेश पऊळ, तहसीलदार दारव्हा.
तालुक्यात नागरिकांना घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा नियमित राहावा, यासाठी प्रशासनाने दक्षता मोहीम सुरू केली आहे. वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक कार्यरत करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत वितरकांकडून पुरेसा गॅस उपलब्ध असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. नियमबाह्य प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
