पेरमिली येथील माजी सरपंचाची फसवणूक; आलापल्ली येथील घटना.
अहेरी :- तालुक्यातील पेरमिली येथील माजी सरपंच बापुजी सडमेक यांनी २ ऑकटोबर रोजी आपल्या वैयक्तिक कामाकरिता आलापल्ली येथे गेले. बाजारपेठेतून काही वस्तू घेण्याकरिता पैशाची अडचण भासली. त्यामुळे त्यांनी आलापल्ली बस स्थानक जवळ असलेल्या सिम विक्री करणाऱ्या आधार एटीएम वाल्याजवळ जाऊन आधार कार्ड द्वारे एक हजार रुपये काढायला सांगितले. त्यावेळी त्या आधार एटीएम वाल्यांनी या संधीचा फायदा घेत त्याने त्यांच्या आधार कार्ड द्वारे 5000 रुपये विड्रॉल केले. व संबंधित ग्राहकाला फक्त एक हजार रुपये हाती दिले. त्यानंतर काही वेळाने संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर पाच हजार रुपये विड्राल झाल्याचे मेसेज आले. तो मेसेज पाहताच माजी सरपंच बापूजी सडमेक यांना धक्काच बसला. त्यांनी त्वरित त्या आधार एटीएम वाल्याकडे जाऊन विचारना केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवी चे उत्तर देत विचारणा करणारा ग्राहकालाच धमकी देत असल्याचे वायरल व्हिडिओ वरून दिसत आहे.
त्यामुळे माजी सरपंच बापुजी सडमेक यांनी काही नागरिकांना बोलावून पुन्हा एकदा विचारणा केली. त्यावेळी नागरिकांची गर्दी पाहता त्या आधार एटीएम वाल्याने ‘मी त्यांची गंमत केलो ‘असे म्हणून उर्वरित रक्कम परत दिले.
अहेरी तालुक्यात प्रत्येक गावागावात सीएससी सेंटर,सेतू केंद्र, व आधार एटीएम असून त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार करीत असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे. 2 ऑक्टोंबर ला झालेल्या एक प्रतिष्ठित नागरिक पेरमिली गावचे असलेले माजी सरपंच यांना आपल्याच रकमेसाठी त्रास सहन करावा लागला. इतरांचे काय हाल होणार हे त्या घटनेवरून दिसून येत आहे.