
*कोचीनारा येथील दोन दिवसीय सस्वर मानस गायन स्पर्धेचे समापन*
*स्पर्धेत एकूण वीस मंडळींचा सहभाग*
*कोरची :-* मागील 19 वर्षांपासून निरंतरपणे सुरू असलेल्या कोचीनारा येथे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात व थाटात दोन दिवसीय सस्वर मानस गायन स्पर्धेचे समापन झाले असून सदर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून भास्कर ठोंबरे, पंधरे, जीवन भैसारे, राहुल अंबादे, हिरामण मेश्राम, डॉ. राऊत बेलगाव, समशेरखान पठाण, रूपराम देवांगन, अजय सहारे आदी उपस्थित होते
दोन दिवसीय मानस गायन स्पर्धेत एकूण 20 मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता त्यामध्ये पुरुष गटांमध्ये मुरीया मानस मंडळी परसोदा बस्तर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर माधुर्य मानस प्रचार समिती पेरियाडिह धमतरी, लव निमेश मानस मंडळी रायपूर, स्वांत सुखाय मानस प्रचार समिती धमतरी, सोनचिरैया मानस परिवार पिथौरा यांना क्रमशः द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम पुरस्कार देण्यात आले व महिला गटांमध्ये नवदीप बालिका मानस परिवार अंबागड चौकी यांनी प्रथम तर श्री आराधना बालिका मानस परिवार कुंदुरपारा बालोद यांना द्वितीय व नवजागृती महिला मानस परिवार भौराभाटा यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.
विशेष पुरस्कारांमध्ये पेटियाडिह येथील चेतन देवांगन यांना उत्कृष्ट व्याख्याकार, रायपूर येथील कु. सीमा पटेल यांना उत्कृष्ट गायन, कुंदुरपारा येथील मंचस्त मंडळीला उत्कृष्ट संगीत व परसोदा कांकेर येथील जगन्नाथ कुलदीप यांना उत्कृष्ट तबलावादक म्हणून विशेष पुरस्कार देण्यात आले
मागील दोन दिवसांपासून संपूर्ण कोचीनारा हे राममही झाले होते तर संपूर्ण कोचीनारा वासियांनी तन-मन-धनाने दोन दिवस निरंतर सेवा केली व मागील 19 वर्षांपासून सुरू असलेला हा उत्सव अशाच प्रकारे निरंतर सुरू राहावा व नागरिकांनी सर्व धर्म समभावचा उदाहरण या कोचीनारा गावातून घ्यावा असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी आपले अध्यक्षीय मार्गदर्शनात केले
त्या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी संपूर्ण कोचिनारा वासीयांनी अथक परिश्रम घेतले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण मेश्राम यांनी केले तर गुणलेखकाची भूमिका जीवन भैसारे व पंधरे यांनी सांभाळली आभार प्रदर्शन उपसरपंच रुपराम देवांगण यांनी केले.