जयाताई लाभसेटवार
उपसंपादक
इंद्रावती विदर्भ टाइम्स
दारव्हा (यवतमाळ):–16 ऑगस्ट पासून विविध मागण्यांसाठी सरपंच संघटना,ग्रामसेवक संघटना,ग्रामरोजगार सेवक संघटना व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या संपास संगणक परिचालक संघटना यवतमाळ जिल्ह्याकडून जाहीर पाठिंबा दिला असून जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक यानी राज्यव्यापी संपात सहभागी व्हायच्या सूचना संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष राजकुमार महल्ले यांनी केल्या.तसेच आपल्या कोणत्याच घटकाकडे राज्य शासन लक्ष देत नसून आपला प्रश्न राज्य सरकार सोडवत नसल्याने राज्यातील सरपंच संघटना,ग्रामसेवक संघटना,संगणक परिचालक संघटना,ग्रामरोजगार सेवक संघटना व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना या सर्वांच्या वतीने 16 तारखेपासून बेमुदत संप पुकारण्यात आले.
आंदोलनात संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी घेतलेली आहे,त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक या संपात सहभागी होत असल्या बाबत ची माहित जिल्हा अध्यक्ष राजकुमार महल्ले यांनी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ तसेच पंचायत समिती ला सादर केल्याची माहिती दिली.चौकट त्याच बरोबर येत्या काही दिवसात जी कोणती राज्य संघटना आपल्या हिताचे निर्णय प्रामाणिक घेतली त्यांना आपण पाठिंबा देऊन त्या आंदोलनात सुद्धा सहभागी होऊ शेवट ची लढाई मनून आपण ही लढाई लढू व जिंकण्याचा प्रयत्न करू असे मत दारव्हा तालुका अध्यक्ष अमोल डेरे यांनी व्यक्त केले.