
नेताजींच्या जयंती दिना निमित्त लखमापूर बोरी इथे स्वच्छता अभियान
लखमापूर बोरी:-
चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी इथे नेहरू युवा केंद्र गडचिरोली प्रेरित शिवछत्रपती युवक मंडळ लखमापूर बोरी च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंती दिना निमित्त गावातील आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणी मंडळाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
लखमापूर बोरी गावामध्ये दरवर्षी युवकांच्या पुढाकाराणे गावातील सार्वजनिक धार्मिक व इतर पर्यटन स्थळांवर जाऊन स्वच्छता अभियान राबविल्या जाते. तसेच वनराई बंधारे बांधने व स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धा आयोजित करून युवकांना अभ्यासासोबत मुलांचे शारीरिक खेळाच्या गुणांना वाव मिळावा यासाठी प्रोत्साहीत केल्या जातं असते.
यावेळस मंडळाचे सदस्य म्हणून सचिदानंद बारसागडे, ईश्वर सुरजागडे, दिलखुश बोदलकर, रोशन वासेकर, टिकाराम शेंडे, रोशन बोरीकर, केशव सातपुते, प्रणय वासेकर, चेतन सातपुते, भारत सुरजागडे, श्रीकांत बारसागडे, कार्तिक कोहळे, नागेंद्र बोदलकर हे उपस्थित होते.