नगराध्यक्षा रेखाताई मोहूर्ले यांचा ओबीसी संघटने कडून सत्कार.
एटापल्ली;
नगरपंचायत एटापल्ली येथे अध्यक्ष पदावर निवडून आलेल्या श्रीमती रेखाताई मोहुर्ले यांचा ओबीसी संघटना एटापल्ली शाखेचे पदाधिकारी व ओबीसी बांधवाकडून श्रीमती रेखाताई मोहूर्ले यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याकडे ओबीसी करिता ओबीसी समाज गृहाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली .
याप्रसंगी एटापल्ली येथील ओबीसी संघटनेचे पदाधिकारी श्री वासुदेव चनकापुरे सहसचिव, श्री राकेश मूकेरवार कोषाध्यक्ष, श्री मारेवार ,मुक्तीपथ एटापल्ली तालुका प्रवर्तक आणि शहरातील ओबीसी बांधव गणपत मोहूर्ले राजेश मोहूर्ले तसेच प्राध्यापक डॉ बी. डी. कोंगरे, प्राध्यापक चंद्रकांत घोंगडे, प्राध्यापक डॉ राजीव डांगे ,प्राध्यापक मेहेर ,प्राध्यापक प्रभुदास डोंगरवार ,प्राध्यापक तानाजी धोंगडे व इतर ओबीसी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते
सत्कार समारंभ आयोजन आणि आणि सभा नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी घेण्यात आली . या कार्यक्रमात प्रा कोंगरे व श्री मालेवार यांनी मार्गदर्शन केले व ओबीसी संघटनेचे प्रसार व प्रचार करण्याचे आवाहन केले यासाठी प्राध्यापक मंडळी कडून मोलाचे सहकार्य मिळाले तसेच शहरातील ओबीसी बांधवानी सुद्धा मदत केली.
