 
                पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राच्या उमेदवारी करिता तनुश्रीताई आत्राम यांची जनतेची वाढती पसंती.
अहेरी(गडचिरोली):– गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच ग्रामीण भागात आतापासूनच निवडणुकीचे रंग चढल्याचे दिसून येत आहे. पेरमिली – राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपापले उमेदवार निवडण्यात व्यस्त आहेत.
पेरमिली- राजाराम जिल्हा परिषद मतदारसंघात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या तनुश्री ताई आत्राम यांना जिल्हा परिषद उमेदवारी करिता अनेक गावागावातून पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उमेदवारी बाबत चर्चेला उधान आले आहे.
तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम हे माजी मंत्री तथा आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांचे कन्या आहेत आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष व गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य आहेत.आणि त्यांचे कार्य प्रामुख्याने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहे. तनुश्रीताई सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी प्रत्येक गावागावात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
केवळ लोकसेवेच्या भावनेतून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी सुरु केलेला ‘एक हात मदतीचा’ लोककल्याणकारी उपक्रम निःस्वार्थ भावनेने सुरु केला. हा उपक्रम अवघ्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचविला आहे.
उपक्रमांतर्गत महिलांना सक्षमीकरण करणे, गरजू नागरिकांना विनामूल्य आभा कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र अशी महत्वाची कागदपत्रे काढून देत नागरिकांच्या अडचणी दूर केल्या. नागरिकांच्या कोणत्याही अडचणींना धावून जाणारे तनुश्री ताई हे परिसरातील नागरिका करिता देवदूत ठरले आहेत.
तनुश्रीताई यांनी ‘मीट द प्रेस’ कार्यक्रम घेऊन डिजीटल मीडियाच्या पत्रकारांशी संवाद साधला. महत्वाची कागदपत्रे काढून देताना महिला, युवक, युवती, शेतकरी, मजूर हे आपल्या समस्या जाणून घेत वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टे मिळवून देणे, विश्वकर्मा योजनेंतर्गत महिलांना शिलाई मशिन, कामगार योजनेंतर्गत कीट, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देण्याचे काम केले आहे. पूरग्रस्त लोकांना वेळेवेळी मदत केली. त्यामुळे पेरमिली- राजाराम परिसरात त्यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीकरिता नागरिकांचे पसंती ठरल्याचे दिसून येत आहे.

 
                         
                     
                     
                     
                     
                     
                     
                    