मुख्यमंत्री साहेब, राज्यातील पत्रकारांना संरक्षण द्या.! पत्रकार संरक्षण समितीकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र..
पत्रकार संरक्षण समिती चे राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ यांनी नाशिकच्या मुख्यमंत्री सचिवालयात दिले निवेदन.
नाशिक:- पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र यांचे वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले, दि २० मार्च २०२६ रोजी पत्रकार संरक्षण समिती चे राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ,उत्तर महाराष्ट्र प्रमुख माया मुक्ताई नाशिकचे जिल्हाध्यक्ष देवचंद महाले यांनी पत्रकारांच्या मागण्या संदर्भात नाशिकच्या मुख्यमंत्री सचिवालयात हे पत्र सुपूर्द केले.
निवेदनात ग्रामीण पत्रकारांची ग्रामविकासातील भूमिका मांडण्यात आली आहे, ग्रामीण पत्रकार सातत्याने राजकीय प्रशासकीय पातळीवर मूलभूत सुविधापासून, शासन नियुक्त समित्यापासून वंचित असल्याच म्हंटल आहे,राज्यात ग्रामीण भागात पत्रकारिता करणारे असंख्य पत्रकार आहेंत, मात्र केवळ ओळखपत्र देऊन त्याची बोळवन केली जाते, साधे वृत्तांकनाचे मानधन ही मिळत नाही, मिळाले तर ते ही तूटपुंजे असते,दरम्यान शहरात किंवा मोठया पडस्थ पत्रकारावर हल्ला झाला किंवा मारहाणीची घटनां घडली की मोठ्या संख्येने ग्रामीण पत्रकार आंदोलने करतात, निवेदने देतात, मात्र ग्रामीण पत्रकारावर हल्ला झाला, किंवा दमदाटी झाली,तर त्याला मात्र वाऱ्यावर सोडलं जातं, साधी त्याची पत्रकार हल्लाविरोधी कायद्यान्वये तक्रार घेतली जातं नाही, त्यास संरक्षण दिल जातं नाही ही वस्तुस्थिती आहे, गाव विकासात सामाजिक मुद्द्याना आपल्या बातमीतून वाचा फोडणारे दिवंगत सुरेश भोर सारखे जेष्ठ पत्रकार आजारात उपचारासाठी योग्य उपचार न मिळाल्याने हाल हाल होऊन देवाघरी जातो हे दुर्दैव नाहीतर काय?मुख्यमंत्री सहायता निधी, पत्रकार कल्याण निधी नेमका मिळतो कोणाला? यावर नियुक्त पत्रकार नेमके करतात काय? हा सवाल आहे, दरम्यान ग्रामीण पत्रकाराना व त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही आरोग्यसेवा, पत्रकार पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही, जाचक अटी असल्याने साधे आधीस्वीकृती पत्र मिळत नाही,हे दुर्दैव फार थोडे दप्तरी कार्यरत पत्रकार सोडले तर बहुतांशी नामधारी पत्रकार त्यांचे कुटुंबियांना अधिस्वीकृती मिळते याबद्दल अनेकदा तक्रारी ही केल्यात मात्र जिमाका ला काही घेणं देण नाही. ही वस्तुस्थिती आहे, ग्रामीण पत्रकार गावासाठी राबत झटत असतो, मात्र त्याला साधा एसटी पास मिळत नाही, इतक्या विवंचना पेलून दुसऱ्यासाठी गावासाठी राबणारे ग्रामीण पत्रकारितेची अशी विवंचना थांबवावी अशी मागणीपत्रकार संरक्षण समितीचे वतीने या निवेदनात मुख्यमंत्र्यांकडे केली आहे,
