मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते बचत गटांना प्रोत्साहन रक्कम वितरित.
गडचिरोली:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आदिशा प्रकल्प आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) बचत गट अंतर्गत ग्रामीण भागात विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या बचत गटांना प्रोत्साहन रक्कम वितरित केले.
यावेळी प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आलेले बचत गट
आदिशा प्रकल्प अंतर्गत जननी प्रभाग संघ – आलापल्ली ₹1,00,000 प्रोत्साहन रक्कम,उन्नती प्रभाग संघ – पेरमिली (अहेरी) ₹1,00,000 प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) बचत गट अंतर्गत बिरसा मुंडा महिला बचत गट – राजाराम, ता. अहेरी – ₹1,00,000 प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आले.
