ताडगाव येथील चिकन विक्री दुकानात चिकन सोबतच मिळत होते देशी दारू.
ताडगाव पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या धाड टाकून 4 हजार रुपये किमतीची देशी दारू केली जप्त.
भामरागड(गडचिरोली):- भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील चिकन विक्री दुकानात चिकन सोबत देशी दारू विक्री होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताडगाव पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या 4 हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करीत सदर दारू विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ताडगाव येथे चिकन विक्री दुकानात चिकन सोबत देशी दारू विक्री केल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे ताडगाव पोलिस व मुक्तीपथ टीमने संबंधित दुकानात धाड टाकून तपासणी केली असता 4 हजार रुपये किमतीची देशी दारू आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमुळे परिसरातील इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई ताडगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक रंजीत म्हस्के व पोलिस पथकाने केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक निळा किन्नाके, उपसंटक भुपेंद्र सडमेक व ग्रामस्थ उपस्थित होते.
