*छत्तीसगडकडे जाणारा भरधाव ट्रक उलटला,*
-चालक गंभीर जखमी नागरिकांनी ट्रॅकचे कॅबीन तोडून चालकाला काढले बाहेर.
*कोरची:-* हैदराबादहून माल घेऊन जाणारा ट्रक कुरखेडा-कोरची रस्त्यावर छत्तीसगडकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकचे अचानक नियंत्रण सुटले आणि तो उलटला. चालकाच्या डोक्याला दुखापत झाली आणि तो गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता कोरची शहराजवळील जांभळी फाटा जवळ घडला. हैदराबाद येथील रहिवासी असलेले चालक टी. ओमशी (२५) यांना उपचारासाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघात झाला तेव्हा ट्रक चालक टी. ओमशी हे त्यांच्या ट्रक क्रमांक टीएस ०७ यूजी-३६४५ मध्ये संगमरवरी दगडाचा चुरा घेऊन हैदराबादहून छत्तीसगडला जात असतांना सदर अपघात झाला. कोरची पोलिसांनी पंचनामा करून, गुन्हा दाखल केला आहे.
