
बायफ संस्थेच्या माध्यमातून मेडपल्ली येथील दादाजी बावणे यांच्या शेतात श्री पद्धतीने भात लागवड.
अहेरी तालुक्यातील 42 गावा मधून 140 शेतकरी ची श्री पद्धतीने भात लागवड करिता निवड.
अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प.
अहेरी:- भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शन खाली व बायफ संस्थेच्या पुढाकाराने अंमलबजावणी सुरू आहे .याच प्रकल्प चा एक घटक उपजीविका विकास असून या अंतर्गत शेतकऱ्यांचे उपजिविकेचे असणारे साधन यांना नवीन माहिती तंत्र यांची जोड देऊन त्यांच्या उत्पन्न मध्ये वाढ करणे, उत्पन्नाची साधने, घटक वाढविणे, शेतीमधील खर्च कमी करणे, तंत्रज्ञान हस्तांतरित करणे, या प्रकल्प द्वारे करण्यात येत आहे.
यासाठी या वर्षी बायफ संस्थे अंतर्गत अहेरी तालुक्यातील सन 2025 – 26 खरीप हंगामामध्ये 42 गावा मधून 140 शेतकरी ची निवड करून यांना श्री पद्धत, पट्टा पद्धत धान लागवड करण्याचे काम सुरू केले आहे.तसेच 36 भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रेलिस पद्धतीने लागवड करण्याचे काम सुरू आहे.याचाच भाग म्हणून दि. 28 जुलै रोजी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील दादाजी तुकाराम बावणे यांच्या शेतात श्री पद्धतीने भात (धान) लागवड करून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायत चे सरपंच निलेश वेलादी, परिसरातील शेतकरी उपस्थित होते तसेच बायफ संस्थे चे अतुल डोर्लीकर उपस्थित राहून माहिती दिली तर संपूर्ण नियोजन, परिश्रम प्रेरक बाबुराव तलांडी यांनी घेतले.