बोगाटोला जंगल परिसरात पुरलेल्या अनोळखी मृत्यदेहाचा 72 तासात छडा लावण्यात पोलीसांना यश
दिनांक 31/01/2025 रोजी पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत जिल्हा गडचिरोली जिल्ह गोदिया, राज्य छत्तीसगड सिमेलगत मौजा बोगाटोला गावाशेजारील जंगल परीसरात एक पुरूष जातीचा अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील अर्धवट पुरलेले प्रेत मिळुन आल्याने मर्ग दाखल करण्यात आला. व तपास वरीष्ठाचें मार्गदर्शनात सुरू झाला. केलेला पंचनामाप्रमाणे तसेच PM अहवालाप्रमाणे मयताला कोणीतरी धारदार शस्त्राने मानेवर चेहऱ्यावर वार करून जिवानीशी ठार मारले आहे व गुन्हा उघड होवु नये म्हणुन पुरण्याचा प्रयत्न केला आहे हे निष्पण झाले. त्यावरून पोलीस ठाणे कोरची येथे अप क 19/2026 कलम 103(1), 238 BNS 2023 प्रमाणे दिनांक 02/02/2026 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.
मयताचा चेहरा कुजलेला असल्याने चेहरा ओळखु येत नव्हता. त्यामुळे गुन्हयाचा छडा लावणे हे आव्हानात्मक होते. घटनास्थळावर मिळुन आलेले वस्तु त्यात एक प्लास्टीकची पोतळी (चुगंळी) व पुरण्यासाठी म्हणुन काहीतरी टीकावुसारखे हत्यार वापरले असावे असा घटनास्थळावरील निशानीचा आधार घेत तपास सुरू असतांना गोपनीय माहीतगारा मार्फत माहीती मिळाली की दिनांक 20/01/2026 रोजी जांभुळखेडा ता कुरखेडा येथील 4 इसम हे सदर परीसरात कोणाचे तरी घरून टिकावु घेवुन गेले. या आधारावर चौकशी करता. 1) शानु पठाण रा. जांभुळखेडा यांचे प्रेमसंबध डोंगरगढ़ (छत्तीसगढ) येथील सोनाली जितु कंवर वय 25 हया विवाहीत महीलाबरोबर होते. त्याची चुनूक तीचा पत्ती जितु कवंर हीला लागल्याने व तो दोघांचे प्रेमात अडसर ठरत असल्याने कटाप्रमाणे सोनालीने तीचा पती जितु कवंर वय 30 वर्ष, रा. जठकन्हार ता. डोंगरगड जिल्हा राजनांदगाव हयाला खुशिंपार ता कोरची जिल्हा गडचिरोली येथे बोलाविले. आरोपी महीला सोनाली व मयत पती जितु कंवर हे व परत डोंगरगडकडे सासरी जात असंतांना त्याची माहीती सोनाली हीने तीचा प्रीयकर शानु पठाण याला दिली. व कटाप्रमाणे 1) शानु पठाण आणि 2) सोनाली कवंर या दोघांनी सानुचे मित्र 3) पुंकेश बोरकर 4) चंद्रशेखर गुज्जेवार 5) धनपाल मडावी सर्व रा.जाभुळखेडा ता. कुरखेडा यांची मदत घेवुन सर्वांनी मिळून बोगाटोला जंगलाजवळ गाडी बाहाण्याने थांबवुन धारदार हत्याराने खुन केला हे. तपासात निष्पण झाल्याने सर्व 5 आरोपीतांना 04/02/2026 रोजी अटक करण्यात आली. गुन्हयाचा तपास शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री निलोत्पल सा.अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) श्री, गोकुलराज जी सा, अपर पोलीस अधिक्षक (अभियान) श्री, एम. रमेश सा. उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री, अरूण फेगडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सपोनी देशमुख, पोउपनी विकास चौव्हाण स्थागुशा गडचिरोली, HC / लक्ष्मण नैताम, यशवंत जुमनाके, PC दिलीप उईके, धिरज हलामी, लक्ष्मीनारायन टेंभरे, विजय गायधने, उत्तम घरत, नरेंद्र धोंडणे, इन्साराम ताराम, दिनेश भोसले, दिनेश कुवर, मपोशी / प्रतिक्षा जंगठे पोलीस ठाणे कोरची यांनी पार पाडली
