वायगाव येथील भारतरत्न डॉ. बि.आर.आंबेडकर विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना; सहविचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी……
चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथील भारतरत्न डॉ.बि.आर. आंबेडकर विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना तसेच सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संजय वाढई अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अॅड. चेतन दुर्गे, प्राचार्य प्रमोद मेश्राम, माजी पंचायत समिती सदस्य विनोद मडावी, कु. अर्पणा उंदीरवाडे, शिक्षक सुनील खोब्रागडे व ज्येष्ठ शिक्षक रविंद्र उराडे तसेच इतर माजी विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सभेत शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक–सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने माजी विद्यार्थी संघाची गरज स्पष्ट करण्यात आली. या संघाच्या स्थापनेमुळे शाळेचा विकास, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच स्थानिक शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, याबाबत उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. माजी विद्यार्थ्यांची बांधिलकी, सहकार्य आणि विद्यालयाशी असलेले भावनिक नाते अधिक मजबूत व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सर्वांनी एकमताने चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक कालिदास बन्सोड यांनी प्रभावीपणे केले तर प्रास्ताविकातून शासनाच्या परिपत्रकाचे वाचन रविंद्र उराडे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन संदीप कोचे सरांनी मान्यवरांचे आभार मानले. उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
ही सहविचार सभा व माजी विद्यार्थी संघाची स्थापना विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीस नवे बळ देणारी ठरली.
