
जयपुर येथील सहाव्या पॅरा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत आष्टीच्या श्वेताला रौप्य पदक
आष्टी,
दिनांक 11 ते 13 जानेवारी 2025 दरम्यान पौर्णिमा विद्यापीठ जयपूर या ठिकाणी सहावी राष्ट्रीय पॅरा धनुर्विद्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खेलो इंडिया सेंटर आष्टी तथा महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. श्वेता भास्कर कोवे हिने संघिक रौप्य पदकाची कमाई केली.व गडचिरोली जिल्ह्याचे, महाराष्ट्र तथा वन वैभव शिक्षण संस्थेचे नाव रोशन केले. त्याबद्दल वन वैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम तसेच त्यांच्या सहचरणी नागपूर विभागीय राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष शाहीन भाभी हकीम यांनी श्वेताचे जोरदार अभिनंदन केले व तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले,प्रा.सर्फराज आलम, यांनी श्वेताचे अभिनंदन केले.पर्यवेक्षक घाटबांधे तथा सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा श्वेताचे अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र दिव्यांग खेळाडू श्वेतासाठी झटणाऱ्या डॉ. श्याम कोरडे यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन केले. श्वेताने सुध्दा आपल्या यशाचे श्रेय डॉ. श्याम कोरडे यांना दिले.श्वेता भास्कर कोवे जन्मतः विकलांग असून आदिवासी समाजातील मुलगी आहे तिचे वडील स्वर्गवासी झाले आहेत, आई मंजूताई कोवे शेती व गावातील बकऱ्या चारण्याचे काम करते