
सौ. जयाताई लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
यवतमाळ/कळंब:- श्रावण महिन्यात आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त कळंब येथील श्री चिंतामणी मंदिर परिसरात मंगळवारी भाविकांची प्रचंड गर्दी पहायाला मिळाली. रात्री पासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या, तर सकाळी दहा पर्यंत नेहरू चौकापर्यंत सुमारे एक किलोमीटर लांबच लांब रांग दिसत होती. यवतमाळ,राळेगाव बाभुळगाव, आदी भागांतून अनेक भाविक दर्शनाकरिता मंदिरात दाखल झाले होते.
पुराणानुसार, श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीला श्री चिंतामणीचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा असल्याने भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभ्या असलेल्या भक्तांचे दर्शन साडेअकरा वाजता झाले, तर दुपारी तीन वाजेपर्यंत रांग नेहरू चौकापर्यंत होती. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने कठड्यांची व्यवस्था, रस्त्यावर कापडी मंडप, पिण्याचे पाणी, उसळ, चहा आणि फराळाची ळाची सोय केली होती. स्वयंसेवकांनी सतत भाविकांना
पाणी व नाश्ता पुरवला. गावकऱ्यांसह गोदावरी अर्बन बँकेनेही थंड पाणी व नाश्त्याची सोय केली. मात्र पोलीस स्टेशन ते नेहरू चौक दरम्यान उन्हात उभ्या असलेल्या हजारो भक्तांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. पायात चप्पल-जोते नसल्याने अनेकांच्या पायांना भाजल्यासारखे झाले. या दिवशी अंदाजे लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे देवस्थान सचिव बसवेश्वर माहुलकर यांनी सांगितले. भक्त व्यवस्थापनात अध्यक्ष संतोष कुचनकर, रवींद्र पडोळे, शैलेंद्र साठे, सौ. सारिका ठोंबरे, महाजन, माजी अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, शाम केवटे, राजू भोयर, नरेश इंगळे, सौ. प्रतिभा मेत्रे व कर्मचारी वर्ग यांनी योगदान दिले.
कार्यक्रमास रोजगार हमी योजना समितीचे (मावळ) आमदार सुनील शेळके, आमदार किशोर दराडे (नाशिक), आमदार राजेश वानखेडे (तिवसा) आणि किरण सरनाईक (अमरावती) यांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने त्यांचा सत्कार केला.
विशेष म्हणजे, राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पत्नीसह रात्री एक वाजता यवतमाळ येथून अनवाणी पायांनी चालत आले आणि सकाळी सहा वाजता श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाचे वातावरण दिसून आले.
या गणेश कुंडात दर बारा वर्षांनी आपोआप पाणी वर येतो
विदर्भातील अष्टविनायकमधील एक गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणी मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायर्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.