
धाडीत एकुण २,०३,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
अहेरी/गडचिरोली:- अहेरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधपणे चालणाऱ्या धंदयावर आळा घालण्याचे अनुषंगाने निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक अहेरी,अमर मोहीते उप विभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहेरी चे पोलीस निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार, सपोनि देवेंद्र पटले, सपोनि वळवी, पोउपनि चैतन्य घावटे, पोउपनि सागर माने,पोउपनि अतुल तराळे, पोउपनि करिश्मा मोरे, पोलीस हवालदार मनोज शेंडे,विठठल रामटेके, प्रशांत कांबळे, नापोशी/ तुलावी, पोशी / बेलाडे, चापोउपनी आगबत्तनवार, हे दि.८ फेब्रुवारी रोजी अवैध धंदयावर आळा घालण्याकरीता मुखबिरब्दारे खात्रीशीर माहितीच्या आधारे मौजा आलापल्ली एटापल्ली रोड येथे काही इसम अवैधरित्या मोठा कोंबडा बाजार भरवुन, कोंबडयाच्या पायाला धारदार कात्या बांधुन दोन कोंबडया मध्ये लढाई लावुन त्यावर पैश्याची बाजी लावुन हारजित चा खेळ खेळत असल्याची माहिती प्राप्त झाली. वन विभागाचे डेपो जवळ गाडी थांबविली असता तेथे दुचाकी वाहणे ठेवल्याचे दिसुन आले. तसेच लोकांची गर्दी दिसुन आली. पोलिसांनी कोंबडा बाजारात धाड टाकण्यास सुरूवात केली.या धाडीत काही कोंबडा बाजार शौकीनांना पकडण्यास पोलिसांना यश आले.तर काही जण कोबडे व दुचाकी घेवुन पळून गेले.
या धाडीत प्रदिप राऊजी इस्टाम वय २९ वर्ष धंदा- मजुरी रा. टेकुलगुडा ता. अहेरी, जि. गडचिरोली,विजय अशोक गुप्ता वय ३६ वर्ष धंदा- मजुरी रा. वॉर्ड क्रं. ०४ आलापल्ली वेलगुर रोड ता. अहेरी जि. गडचिरोली, मोसिन रोब शेख वय ३२ वर्ष धंदा- चिकन शॉप रा. वॉर्ड क्रं. ०४ आलापल्ली वेलगुर रोड ता. अहेरी जि. गडचिरोली,रोहित रामानंद मिस्त्री वय १९ वर्ष धंदा मजुरी रा. मदुमुडगु वॉर्ड क्र.०३ आलापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली इत्यादींना पकडण्यात यश आले. पकडलेल्या इसमा कडून दोन जिवंत कोंबडे किंमत प्रत्येकी ३०० रु प्रति नग एकुण किंमत ६०० रु,एका काळया कथ्या रंगाच्या पॉकेट मध्ये १८ धारदार कात्या कोंबडयाच्या पायाला बांधणाऱ्या तसेच कात्या बांधण्याकरिता एक नग दोरी व चिद्या किंमत प्रत्येकी १०० रु एकुण किंमत १८०० रु,प्रदिप राऊजी इस्टाम यांचे अंग ड्रडतीत मिळालेले ५०० रु,मोसिन रोब शेख यांचे अंग झडतीत मिळालेले ४०० रु,दुचाकी वाहण क्र. एम एच ३३/ ए यफ ४३३२ स्ग्लेंडर कंपनीची काळया रंगाची किंमत अंदाजे ५०,००० रु, दुचाकी वाहण क्र. एम एच ३३/ एन ५१५२ ग्लॉमर लाल काळया रंगाची अंदाजे किंमत ४०,००० रु ,दुचाकी वाहण क्रं. एम एच ३३/ एजी ७७२३ स्प्लेंडर कंपनीची बैंक रंगाची किंमत अंदाजं ५०,००० रु,दुचाकी वाहण क्रं. एम एच ३३ ए इ ८२६६ काळया रंगाची पल्सर गाडी अंदाले किंमत १०,००० रु, हिरो स्प्लेंडर नंबर प्लेट नसलेली चेसिस क्रं. MBLHAM१२०L५M९०९८४ अंदाजे किं २०,००० रु,असा एकूण २,०३,३००/-किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्दमाल व आरोपीना ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन अहेरी येथे येवुन वाहणा मधील कोंबडे बाहेर काढले असता सदर जिवंत कोंबडे जखमी असल्याने मयत झाल्याचे दिसुन आल्याने सदर कोंबडे २०० रु. प्रमाणे लिलाव करण्यात आले.त्यामुळे मृत कोंबड्याची किंमत ४०० रु झाली. तरी एकुण २,०३,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
तरी नमुद आरोपी तसेच इतर पाहिजे आरोपी यांनी कोंबडा जातीच्या पक्षाच्या पायाला धारदार चाकु बांधुन त्यांना निर्दयतेने लढाई करुन त्यावर पैशाची बाजी लावून हारजीत चा खेळ करुन स्वत:चा फायदा करुन घेतांना मिळून आल्याने इसम नामे प्रदिप राऊजी इस्टाम, विजय अशोक गुप्ता,मोसिन रोब शेख,रोहित रामानंद मिस्त्री व मिळालेल्या दुचाकी धारकांवर कलम १२ (ब) महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करणेबाबत सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र चुनीलाल पटले वय ३७ वर्ष धंदा नोकरी पोलीस स्टेशन अहेरी लेखी फिर्याद वरुन सदर आरोपी यांचे विरुध्द पोस्टे अहेरी अप.क्र ००३१/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, कलम१२ (ब) अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे.