निलिमाताई बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
अहेरी (गडचिरोली):- अहेरी येथील अजितदादा पवार गट राष्ट्रवादी कांग्रेस तालुकाच्या अध्यक्ष पदी नागेश मडावी यांची मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशावरून जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी नियुक्ती केली आहे. त्यांना अहेरी तालुक्याची अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने अहेरी विधानसभेत सर्व स्तरावरून नागेश मडावीचे अभिनंदन केले जात आहे.
नागेश मडावी हे मनमिळावु स्वभावाचे असून ते अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक कामात नेहमी तत्पर आहेत.यावेळी रवींद्र बाबा आत्राम कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य रामेश्वर बाबा आत्राम, बबलू भय्या हकीम,माजी सरपंच कैलास कोरेत, बाबुराव तोरेम, कैलास पटवर्धन, ताजू कुडमेथे, नागेश पेंदाम, पुष्पाताई आलोने, रतन दुर्गे, डेव्हिड बोगी, इरफान पठाण, विशेष भटपल्लीवार, लक्ष्मण एरावार, बालाजी गावडे तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.