
गडचिरोली:- मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर राज्यसरकार व निवडणूक आयोग निवडणुका घेण्यासाठी सरसावले असून यात गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणु्कांचाही समावेश आहेत.सध्य परिस्थितीत गडचिरोली जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर प्रशासक राज सुरु आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्याने यासाठी सर्वपक्षीयांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहेत.यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षसुद्धा मागे नाहीत. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून सगळीकडे बैठकांचे सत्र सुरु झालेलं आहेत.काँग्रेस पक्ष अहेरी विधानसभेत सुद्धा स्थानिक साठी हमखास जोर देतांना दिसून येत आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे समन्वयक,आदिवासी विद्यार्थी संघांचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहेत.
अहेरीतल्या पाचही तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठका घेण्याचे त्यांनी दौरे सुरु केली आहेत.कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून कंकडालवार यांनी प्रत्येक तालुक्यातील आणि प्रत्येक गावांमधील समस्या जाणून घेत आहेत.अहेरी विधानसभेत महायुतीचे उमेदवारांना जोरदार टक्कर देण्यासाठी योग्य रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषदांची एकूण 19 जागा असून यातून किमान बारा जागांवर काँग्रेस व आविसंने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे,सर्वच जागांवर प्रबळ उमेदवार देण्याची ही योजना सुरु असल्याची विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे यशस्वी अध्यक्ष म्हणून पदमुक्त झाल्यापासून तर आजपर्यंत सुद्धा अजय कंकडालवार आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होत संकटात सापडलेल्यांना आपल्यापरिने मदतीचे हात देत आपल्या सेवाभावी वृत्तीने सर्वसामान्य जनतेच्या हृदयात मात्र आपुलकीचे स्थान निर्माण करून घेतांना दिसून येत आहेत.