
अहेरी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या चौकशीत अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळले अळ्या व मुदतबाह्य वस्तू.
गावकऱ्यांनी थेट आमदाराकडे केली होती तक्रार.
अहेरी (गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील सकीनगट्टा येथील अंगणवाडी केंद्रात अनेक दिवसापासून मुलांना आणि गरोदर मातांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याबाबतची तक्रार आरेंदा ग्रामपंचायतीचे सरपंच व्यंकटेश तलांडी यांच्या नेतृत्वात सकीनगट्टा गावातील नागरिकांनी माजी मंत्री तथा आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केले होते.
त्यानंतर आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना बोलवून म्हणाले की, सकीनगट्टा गावातील अंगणवाडी केंद्राचा पोषण आहाराचा पाहणी करून चौकशी करा, जर चौकशी दरम्यान पोषण आहार खराब झाले असेल तर त्वरीत संबंधित अंगणवाडी सेविका आणि जबाबदार असलेले इतरही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगितले.
त्यामुळे अहेरीचे बाल विकास अधिकारी राहुल वरठे यांनी सकीनगट्टा गावात जाऊन अंगणवाडी केंद्रातील पोषण आहाराची पाहणी केली.अंगणवाडी केंद्रातील वाटाणा, तांदूळ, गहू, दाळ यामध्ये अळ्या पडलेले आढळून आले. तसेच तेल, तिखट, मीठ व हळद या पॅकीट चा सुद्धा मुदत बाह्य झालेले होते. यावेळी येथील नागरिकांना प्रकल्प अधिकाऱ्याने अंगणवाडी सेविका बद्दल विचारणा करत सगळे माहिती जाणून घेतले. सकीनगट्टा गावातील अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार विद्यार्थ्यांना व गरोदर मातांना दिलेच नसल्याचे माहिती उघडकीस आली. त्यामुळे सदर पोषण आहार खराब झाल्याचा दिसुन आले.
यावेळी अहेरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल वरठे यांनी गावातील नागरिकांना शब्द दिले की, मी याबाबत दोषींवर कारवाई करतो असे म्हणाले.
यावेळी सकीनगट्टा गावातील अंगणवाडी केंद्राचा पोषण आहाराची पाहणी करतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे,आरेंदा ग्रामपंचायतचे सरपंच व्यंकटेश तलांडी, आरेंदाचे ग्रामपंचायत अधिकारी दिवाकर झाडे, सकीनगट्टा गावातील पाटील रैनु गावडे, वारलु तलांडी, बाबुराव तलांडी, राकेश तलांडी, बाजीराव आत्राम, राजु गावडे, साधू कुळमेथे, अनिल गावडे, चुक्कू आत्राम, केये कुळमेथे, विजा कुळमेथे, सौ. रती तलांडी, देसो आत्राम, विजे गावडे, पोवरी कुळमेथे, नुली तलांडी व सकीनगट्टा गावातील महीला व पुरूष उपस्थित होते.