पेरमिली ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने 29 ऑक्टोंबर पासून आधार कॅम्प सुरू.
आधार कॅम्पचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे सचिव सत्यनारायण बडगु यांचे आवाहन.
पेरमिली( गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वतीने येथे दिनांक 29 ऑक्टोंबर पासून आपले सरकार सेवा केंद्राचे आधार कॅम्प सुरू असून या कॅम्पमध्ये आधार कॉर्ड अपडेट करणे, आधार ला मोबाईल नंबर लिंक करणे, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, गोल्ड कार्ड,जॉब कार्ड इ केवायसी करणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत. आधार अपडेट चे उद्देश, लाडकी बहीण योजने करीता अंत्यत उपयुक्त, बँक व्यवहार देवाण, घेवाण करीता, मोबाईलवर लिंक करणे,आदी अनेक शासकीय उपयुक्त करीता आधार अपडेट करणे अत्यन्त जरुरीचे आहे. ज्या बालकांचे ५ वर्ष पूर्ण झाले आणि ज्याचे वय १५ वर्ष पूर्ण झाले अशा बालकांचे फिंगरप्रिंट बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. या कॅम्पमध्ये अहेरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विकेश संतोषवार यांच्या उपस्थितीत महागाव, आलापल्ली व पेरमीली आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, सर्व आशा वर्कर, हे सर्व सुरू असलेल्या कॅम्पला सहकार्य करीत आहे. पेरमिली ग्रामपंचायती कडून सुरू असलेले आधार कॅम्प तीन दिवस चालणार असून परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन पेरमिली ग्रामपंचायतचे सचिव सत्यनारायण बडगू यांनी केली आहे.
