
झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील पोलीस-नक्षल चकमक.
झारखंड:- महाराष्ट्र व छत्तीसगड पाठोपाठ झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अंदाधुंद फायरिंग झाली आहे. यामध्ये 8 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांकडून संयुक्तपणे ही कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी या भागांत मोठ्या प्रमाणावर पोलीस दलास तैनात केले आहे. दरम्यान, एक कोटींचे बक्षीस असलेला वरिष्ठ जहाल नक्षली नेता विवेक दास्ते या चकमकीत ठार झाल्याची माहिती आहे.
नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यासाठी स्थापन केलेले 209 कमांडो बटालियन फॉर रेजोल्यूट एक्शन (कोबरा) पथकाकडून ही अभियान राबवले जात आहे. या भागात सकाळपासून अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती आहे. मारल्या गेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.झारखंडमधील चाईबासा भागात 12 एप्रिल रोजी आयईडी ब्लॉस्ट झाला होता. त्यात एका जवानाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी झारखंडमधील जरायकेला भागात एंटी नक्सल अभियान दरम्यान सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली.