इंदिरा गांधी विद्यालय, येनापूर येथे शिक्षक मधुकर येडलावार यांचा सेवानिवृत्ती सत्कार उत्साहात संपन्न…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी..
चामोर्शी तालुक्यातील इंदिरा गांधी विद्यालय, येनापूर येथे दीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या आदरणीय शिक्षक मधुकर येडलावार यांचा सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य दिलीप टेप्पलवार यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक वासुदेव गोंगले, तसेच ज्येष्ठ शिक्षक इशाक कुरेशी, प्राध्यापक डॉ. विठ्ठल चौथाले, विनोद कल्लुरवार,यादव पेंन्दाम, कमलकिशोर कन्नाके आणि प्राध्यापिका प्रतिभा बन्सोड मॅडम, जेष्ठ लिपिक प्रमोद येलमुले उपस्थित होते.
सत्कारमंडळातील मान्यवरांनी मधुकर येडलावार सरांच्या दीर्घ सेवाकाळातील कार्य, शैक्षणिक योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली कष्टमय झटपट आणि विद्यालयाला दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
त्यांच्या कार्यशैलीत शिस्त, विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा आणि विषयातील प्रावीण्य यांचा समन्वय असल्याचे सर्व मान्यवरांनी नमूद केले.
येडलावार सरांनी आपल्या मनोगतात विद्यालयातील सहकार्य, विद्यार्थ्यांचे प्रेम आणि आपुलकी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीत योगदान देता आले हेच आयुष्यातले सर्वात मोठे यश आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलकिशोर कन्नाके विद्यालयातील शिक्षकांनी यांनी केले तर प्रास्ताविक विनय कल्लुरवार सर, आणि आभार प्रदर्शन प्रा.प्रतिभा बन्सोड मॅडम विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
समारोपानंतर सर्व उपस्थितांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षकांना पुष्पगुच्छ, शाल–श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नागोबाजी पाटील पेदापल्लीवार , सचिव जयंतराव येलमूले तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शाळेतील उपस्थिती प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या, विशेष म्हणजे
येनापूर ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.
