चामोर्शी नगरपंचायतीत संविधान दिन उत्साहात साजरा..
तालुका प्रतिनिधी चामोर्शी : चामोर्शी नगरपंचायतीच्या सभागृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, बांधकाम सभापती वैभवभाऊ भिवापुरे,कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी मुरलीधर ठेंगरे, सामाजिक कार्यकर्ते जैरामजी चलाख,लिपिक दिलिप लाडे, विजय पेद्दीवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर, सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या संघर्षावर तसेच भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना घेतलेल्या परिश्रमांवर सविस्तर प्रकाश टाकला.
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी मुरलीधर ठेंगरे यांनी संविधान मूल्यांची गरज, नागरिकांचे कर्तव्य आणि आजच्या काळातील संविधानाचे महत्व याबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच संविधान दिन हा लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचा पर्व असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार यांनी नगरपंचायत प्रशासन नागरिककेंद्री बनवण्यासाठी संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांचाच आधार घेत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाला नगरपंचायत कर्मचारी, स्वच्छता कामगार स्थानिक, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. संविधानाची प्रस्तावना सामूहिकरीत्या वाचून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
