
जहाल नक्षली देवा याच्या वर सहा राज्यातील नक्षल चळवळीची जबाबदारी येताच राज्यातील पोलीस झाले आक्रमक.
चार – पाच महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवण्याचं पोलीसांचं टार्गेट:- आयजी संदीप पाटील
गडचिरोली:- एकीकडे नक्षली चळवळ तग धरून ठेवण्यासाठी जहाल नक्षली देवा याच्या खांद्यावर चळवळीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांनी आता मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. नक्षलवादी संघटना कमजोर पडत असल्यामुळे जहाल नक्षलवादी देवा याच्या खांद्यावर महाराष्ट्र राज्यासह छत्तीसगड, तेलंगाना आंध्र प्रदेश,उडीसा व झारखंड अशा सहा राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या भागात तो दलमचं आणि पार्टीचं काम करेल. नक्षलवादी भरती करण्यापासून ते इतर कारवाया करण्यात जहाल नक्षलवादी देवाचा हात समोर आला आहे. त्याची बटालियन कमांडर म्हणून नियुक्ती होताच राज्यातील पोलीस अलर्ट झाले आहेत.
देशातून नक्षली चळवळीचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे. आता पोलिसांनी देवासह इतर नक्षलवाद्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. नक्षल विरोधी अभियानाचे आयजी संदीप पाटील यांनी नक्षल्यांना करारा जबाब देण्यात येईल असे ठणकावले आहे.
चार – पाच महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवण्याचं पोलीसांचं टार्गेट असल्याचे नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख आणि आयजी संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्यासाठी पोलीस राबवणार ॲापरेशन राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोजकेच नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात शिल्लक, त्यांनाच संपवण्यासाठी पोलिसांचा प्लान ठरला आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांची नवीन भरती बंद झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी जहाल नक्षली देवजी याला जनरल सेक्रेटरी बनवल्यानंतर पोलिसांचीही आक्रमक भूमिका दिसून येत आहे. बसवराजूच्या खात्म्यानंतर देवाच्या खांद्यावर नक्षल चळवळीचा भार सोपविण्यात आला. मग पोलीसांचाही प्लान ठरला आहे. देवजीची पत्नी सृजनाक्का हिच्यावर १३१ गुन्हे होते, तिला २०२१ मध्ये पोलिसांनी मारलं. त्यामुळे गडचिरोली पोलिसांना धडा शिकवण्याचा बेडा देवजी याने घेतला होता, पण पाच वर्षांत देवजी काहीही करु शकला नाही, असे आयजी संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.