
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून अडचणीत आणणाऱ्या 15 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल.
गावातील रस्त्या करिता अवैद्य रीतीने मुरूम उत्खनन प्रकरण.
सोलापूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिस्तप्रीय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन केलेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाले आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, अखेर अजित दादांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू (सोलापूर) येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामध्ये राष्ट्रवादीचे वरिष्ठ कार्यकर्ते यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्डूतील दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर 575/1 मधील 0.20 आर जमिनीमधील अंदाजे 120 ब्रास मुरूम रक्कम अंदाजे 72,000 हजार रुपये, बाहेर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगणमत करुन तहसीलदार माढा यांची कोणतीही परवानगी न घेता पर्यवरणाचा ऱ्हास करुन मौजे कुर्ड शेती गट नंबर 575/1 मधील शेतकरी दादाराव गोरख माने यांच्या मालकीचे 0.20 आर. जमीनमधील अंदाजे 120 ब्रास मुरुम प्रति ब्रास 600/- रुपये प्रमाणे एकूण 72,000/- रुपयांचा मुरुम अवैद्यरित्या उत्खनन करून चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आले
कुर्डूवाडी पोलीस ठाणे गु.र.नं 371/2025 बी.एन.एस.चे कलम 303(2),3(5) व पर्यावरण संरक्षण अधिनियम 9.15 प्रमाणे फिर्यादी-प्रीती प्रकाश शिंदे वय 27 वर्ष धंदा नोकरी (ग्राम महसूल अधिकारी कुर्डू) रा. मोडनिंब ता. माढा जिल्हा सोलापूर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण.
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की, डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानेगा ना.. असे रागावून अजित पवार बोलले … आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला.
त्यावर पोलीस उपअधीक्षक कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कारवाई थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगतात. घटनास्थळी हा प्रकार 3 तास चालू होता. अंजली कृष्णा आणि पवारांच्या संवादाच्या क्लिप व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार अथवा गुन्हांची नोंद झालेली नाही. काल दुपारी हा सर्व प्रकार घडला. अवैध मुरूम उपसा सुरू असताना आयपीएस महिला अधिकाऱ्याने तेथे धाड टाकून कारवाई सुरू केली असता अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी थेट दादांना फोन लावून दिला होता. वास्तविक ग्रामपंचायतच्या परवानगीने मुरूम उपसा होत असल्याची भूमिका ग्रामस्थांची होती, मात्र कोणतीही ग्रामपंचायत अथवा कागदपत्र सादर न झाल्याने महिला आयपीएस अधिकाऱ्याने कारवाई केली होती. दरम्यान, करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला होता.