
2011 पूर्वीचे अतिक्रमणे नियमानुकूल करून घेण्याचे अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांचे आवाहन.
2011 पूर्वीचे अतिक्रमणाचे पुरावे व अर्ज संबंधित तलाठ्याकडे सादर करा.
महिलांना शेतजमिनीच्या हिश्यात कायदेशीर सह हिस्सेदार बनविण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना सुद्धा सुरू.
सौ. निलिमाताई बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
अहेरी(गडचिरोली):- शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे अशा व्यक्तींनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज, २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे पुरावे व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले शासकीय अतिक्रमणे नियमानुकूल करून घेण्याचे आवाहन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी केले आहे.
महिलांना शेतजमिनीच्या हिश्यात कायदेशीर सह हिस्सेदार बनविण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना राबविले जात आहे. सदर योजनेअंतर्गत कायदेशीर पत्नीचे नाव सह हिस्सेदार मधून सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे.
राज्य शासनाच्या एक ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2011 पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. तसेच शासनाच्या इतर विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलेले, वापरात नसलेले पांदण रस्ते अथवा गावांतर्गत रस्ते तसेच रस्त्यांच्या सीमेमधील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी, विकासासाठी भविष्यात न लागणाऱ्या जमिनीवरील सार्वजनिक रस्त्यांचे हक्क निरसित केले जाणार आहेत.
घरकुलासाठीची अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने कार्यपद्धती निश्चित करून दिलेली आहे. मतदार यादी पुर्न निरीक्षण कार्यक्रम सुद्धा सुरू आहे. ज्यांचे अठरा वर्षे वय पूर्ण झाले आहे अशा व्यक्तींनी नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याकरता संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वयाचा पुरावा जोडावा.
जिवंत सातबारा मोहीम व्यापक स्वरूपात सुरू असून सदर मोहिमे अंतर्गत सातबारा उताऱ्यावरून मयतांचे नाव कमी करून वारसाचे नाव दर्ज करण्याची कारवाई सुद्धा सुरू आहे. संबंधितांनी वारसा फेरफारचे अर्ज, मयतांचे मृत्यू प्रमाणपत्र व वारसां प्रमाणपत्र तलाठ्याकडे देऊन आपले फेरफार करून घ्यावे अशी माहिती अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तालुक्यातील नागरिकांना केली आहे