
आष्टी शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या; बंदोबस्त करण्याची वाहनधारक व नागरिकांची मागणी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात वाहतुकीला अडथळा
आष्टी:-
आष्टी शहरातील प्रमुख मार्गावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोकाट जनावरांचा हैदोस असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजी चौक, सद्गुरू साईबाबा महाविद्यालय, आलापल्ली रोड, रेष्ट हॉउस रोड या परिसरात वाहनधारकांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असते. या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात. त्यांच्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. त्यात सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठी वर्दळ सुरू आहे. त्यात मोकाट गुरांची भर पडलेली आहे. पावसामध्ये वाहन चालकांना त्या मोकाट जनावरांचा त्रास होत आहे. काही वेळा अपघातही झालेले आहेत. शाळा कॉलेज चालू झालेले असून मोकाट जनावरामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याला कारण म्हणजे मोकाट गुरे एकदम धावत – धावत येऊन आडवी येतात शालेय विद्यार्थ्यी घाबरून सैरावैरा पळू लागतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे अशा घटना आष्टी शहरात शहरात घडू नये, म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे. नागरिकांची सुरक्षा करणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे काम आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरक्षेसाठी उपाययोजना करून. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. आष्टी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक, सद्गुरू साईबाबा महाविद्यालय या परिसरात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात व रात्रोच्या सुमारास रोडवरच बस्तान मांडून पुर्ण गृपने बसून राहतात त्यांना कितीही हार्ण वाजविले तरी ते उठून बाजूला होत नाहीत त्यामुळे एकतर त्याचा जीव जाईल नाही तर वाहण चालकाचे जीव धोक्यात येईल असी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अशा मोकाट जनावरांमुळे अपघाताचे धोके वाढले आहेत. नागरिकही भीतीच्या छायेत या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ मोकाट जनावरांच्या मालकांना आवाहन करण्यापेक्षा ठोस आणि कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.