
*जि. प. केंद्र व कन्या शाळा कुनघाडा रै. येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न*
दिनांक 15 ऑगस्ट 2025 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश गझलपेल्लीवार यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद कन्या शाळा कुनघाडा रै. येथे शा. व्य. समितीचे अध्यक्ष तेजस सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमास शा.व्य. स. चे सर्व सन्मा. सदस्य, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे सर्व सदस्य,आदरणीय केंद्रप्रमुख गोमासे सर, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रा.ना. सातपूते सर, सन्माननिय पालक, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, युवक वर्ग, अंगणवाडी कर्मचारी, माता पालक केंद्रशाळा व कन्याशाळा येथील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणा नन्तर कवायत संचलन सादर करण्यात आली. मानवी मनोऱ्याचे प्रात्यक्षिक मुलींद्वारे करण्यात आले. नवसाक्षरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.लेझिम च्या तालावर गावात प्रभातफेरी काढण्यात आली. अश्याप्रकारे स्वातंत्रदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
*उमेश गझलपेल्लीवार*
तालुका प्रतिनिधी गडचिरोली