
*पावसातही देशभक्तीचा जल्लोष – एकलव्य विद्यालय कोरची येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा*
कोरची – मुसळधार पावसाच्या सरींमध्येही एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, कोरची येथे *79 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा* दिमाखात पार पडला. सकाळी साडेसात वाजता विद्यालयाच्या प्रांगणात *माननीय प्राचार्य धर्मेंद्र सिंह ठाकुर* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी *एसएमसीचे उपाध्यक्ष मनितराम मडावी* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर *प्राचार्य मा. धर्मेंद्र सिंह ठाकुर* यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, त्याग, बलिदान आणि जबाबदारी यांविषयी प्रेरणादायी भाषण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले. पावसाच्या वातावरणातही विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी तहसील कार्यालय, कोरची येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात हजेरी लावून राष्ट्रप्रेमाची प्रचीती दिली.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर विद्यालयात *पालक-शिक्षक मेळावा* घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांची प्रगतीपुस्तक पालकांसमोर सादर करण्यात आले व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.