
राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रकल्प अधिकारी भामरागड व सहाय्यक जिल्हाधिकारी देसाईगंज यांचा समावेश.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.
मुंबई:- देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
कोणत्या IAS अधिकाऱ्याची कुठे बदली?
1) डॉ. अशोक करंजकर (IAS: 2009) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2) डॉ. संजय कोलते (IAS 2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3) सुशील खोडवेकर (IAS: 2011) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4) सावन कुमार (IAS 2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5) नमन गोयल (IAS 2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, एटापली उपविभाग, गडचिरोली यांना [मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
6) डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS 2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7) श्रीमती लघिमा तिवारी (IAS 2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अपर मुख्य सचिवांची देखील बदली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचीही ३० जुलै रोजी बदली करण्यात आली. विकास खारगे यांच्याकडे महसूल मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. तर ज्येष्ठ आयएएस अधिकारी अनिल डिग्गीकर यांची पुन्हा बदली करून त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली.