
*पुणे येथील काँग्रेस पक्षाचे कार्यशाळेला जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…!*
गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पुणे येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेला गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे.
नुकताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यपातळीवरील कार्यकारिणी जाहीर केली होती.यात गडचिरोली जिल्ह्याला झुकते माप देत अनेक अनुभवी नेत्यांना प्रदेश पातळीवरील कार्यकारिणीत स्थान दिले होते.
पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाने सर्व नवनियुक्त प्रदेशचे उपाध्यक्ष,महासचिव,सचिव अन्य पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा पुणे येथे आयोजित केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाकडून आयोजित या कार्यशाळेत पक्षाचे अनेक मान्यवरांकडून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.पुणे येथील कार्यशाळेला गडचिरोली येथील नवनियुक्त प्रदेश महासचिव अजय कंकडालवार,रवींद्र गुड्डेवार,पंकज गुड्डेवार प्रदेश सचिव हणमंतू मडावी यांनी हजेरी लावली आहे.