
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, मार्कंडा (कंन्सोबा) येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड
आष्टी: जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, मार्कंडा कंन्सोबा येथील शालेय व्यवस्थापन समितीची सन-२०२५ ते२०२७ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करून समिती नव्याने गठीत करण्यात आली आहे.
यासाठी पालकांची सर्वसाधारण सभा दिनांक ११/०८/२०२५ ला आयोजित करण्यात आली होती. मार्कंडा कंन्सोबा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे या सभेत गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी सौ. प्रिती अमोल कुबडे व उपाध्यक्षपदी राकेश दिवाकर तोरे यांची निवड करण्यात आली. समितीच्या सदस्य पदी महेश ईजगिरवार, संदीप बुरमवार, शोभा फलके, सुनिता कन्नाके, अतुल सिडाम यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. मुरमुरवार सचिवपदी शाळेचे मुख्याध्यापक हे पदसिद्ध सचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस विविध वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .सूत्रसंचालन खोब्रागडे, लसुंदे शिक्षिका यांनी केले. यावेळेस मुख्याध्यापक मुरमुरवार यांनी मार्गदर्शन केले .यावेळेस सहायक शिक्षक नितीन बहिरेवार व पालकवर्ग आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.