
वडसा (देसाईगंज) पं.स. अंतर्गत
कोंढाळा येथील सरपंचा अपर्णा राऊत यांना दिल्लीचे निमंत्रण
महाराष्ट्रातील तब्बल १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून निमंत्रण
देसाईगंज (गडचिरोली):- स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशभरातील विशेष कामगिरी
करणाऱ्या सरपंचांना दरवर्षी निमंत्रण दिले जाते.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
येत्या, शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदनाचा भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी
महाराष्ट्रातील तब्बल १७ सरपंचांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. यात सोलापूर, नागपूर, पुणे, अकोला, ठाण, वाशिम, गडचिरोली, अहील्यानगर,गोंदिया, भंडारा, रत्नागिरी, परभणी, सातारा, अमरावती, लातूर, सांगली आणि
जळगाव इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातून वडसा (देसाईगंज) तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनाही या सोहळ्यासाठी
दिल्लीचे निमंत्रण मिळाले असल्याने गडचिरोली जिल्ह्यासह तालुक्यासाठी आणि गावासाठी अभिमानास्पद व गौरवाची बाब आहे. गावातील सरपंचा अपर्णा राऊत यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्यामुळे कोंढाळा गावाचे नाव आता थेट राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचले आहे.
अपर्णा राऊत यांनी कोंढाळा ग्रामपंचायती अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांना प्राधान्यक्रम देत स्वछ भारत मिशन योजना, घरकुल योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ, हागणदारी मुक्त गाव, वृक्ष लागवड, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा, विधवा-निराधार महिलांच्या उदरनिर्वाहाची प्रश्ने, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, आरोग्य शिबिरे राबवून शेकडो नागरिकांना लाभ यासह विविध मंत्रालयांमार्फत गावाच्या विकासासाठी निधी मिळवून त्यांनी गावाला नवी दिशा दिली. गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज कोंढाळा गाव ‘यशवंत’ ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते त्यांच्या या कामगिरीचा गौरव आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणार आहे. हा सोहळा केवळ स्वातंत्र्यदिनाचा उत्सव नाही, तर गावागावांत बदल घडवणाऱ्या या नेत्यांचा सन्मान आहे त्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सरपंचानी बोध घ्यावा असे यावरुन दिसून येते आहे