
. *नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन*
*महाराष्ट्र सायकल यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात दाखल*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
तालुका सुराज्य महाराष्ट्र सायकल यात्रा,दिनांक 1 मे पासून 15 ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातून 5 हजार किलोमीटरची सायकल यात्रा करीत आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी असलेल्या पंचायत शासन व्यवस्थेत संवैधानिक सुधारणा व्हाव्या, ह्या उद्देशाला घेऊन रवि मानव सुराज्य, अभी आडे, नारायण काळबांडे हे आपल्या मित्रमंडळीसह यवतमाळ जिल्ह्यातून निघाले आहे. ही यात्रा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह 24 जिल्ह्याचा प्रवास करून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील साल्हे या गावांमध्ये त्यांनी भेट दिली. तेथील ग्रामसभेचे व इतर कार्य समजून घेतले. तेथून कुरखेडा येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेला भेट देऊन आदर्शगाव लेखामेंढा व डॉ.अभय बंग ह्यांचे केंद्र सर्चला भेट देऊन ते गडचिरोली शहरांमध्ये जाणार. तेथे स्थानिक आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे भेट घेऊन त्यांना तालुका सुराज्य व्यवस्था हे पुस्तक भेट देणार आहेत.
रवी मानव म्हणाले की सद्याच्या शासन व्यवस्थेत राज्य सरकारने शासन स्तरावरून योग्य त्या सुधारणा केल्यास महाराष्ट्रातील ४० हजार गावे सुजलाम् सुफलाम् होऊ शकते. हा विश्वास सरकारला देण्यासाठी ही यात्रा सुरू आहे
गडचिरोली जिल्हानंतर चंद्रपूर, वर्धा येथून यवतमाळ जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2025 ला यात्रेचा समारोप होईल.