
अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील जिमलगट्टा विदयुत विभागाअंतर्गत येत असलेल्या राजाराम येथील दलित वस्तीत गेल्या दोन वर्षांपासून नवीन जणीत्र (ट्रांसफार्मर)मंजूर करण्यात आले होते. परंतु विदयुत महावितरण च्या निष्काळजी पणामुळे मंजूर झालेले, नवीन जणीत्र लावण्यात विलंब होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही दिवसापूर्वी या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संदीप कोरेत यांना निवेदन देताच पाच दिवसात नवीन जणीत्राच्या कामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते, नंत्तर सदर कंपनीकडे काम देण्यात आले होते. परंतु सदर कंपनीने अर्धवट काम केल्याने येथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. राजाराम येथील दलित वस्तीत कित्येक वर्षा पासून कमी दाबाचा पुरवठा होत असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत राहतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना साप व विंचू पासून जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यात डासाचा पादुर्भाव झपाट्याने वाटत असून मलेरिया, टायफाईड आणि डेंगू या सारख्या महाभयंकर आजारापासून संरक्षण करावा लागत आहे. भविष्यात रोगराही होऊन दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच विद्युत विभागाने तातडीने लक्ष देऊन उर्वरित काम तात्काळ करावे, अन्यथा आलापल्ली येथे महावितरण विदयुत कार्यलयालाच्या समोर उपोषण करणार असा राजाराम येथील दलित वस्तीतील अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव भिमराव गोंगले, सामाजिक कार्यकर्ते मधुकर गोंगले, संतोष दुर्गे, रवि दुर्गे, राजेश दुर्गे, विलास दुर्गे, अशोक शेगावकर, सुधाकर गोंगले, व्यंकटेश गोंगले, किशोर गोंगले,आदी नागरिक पत्रकातून केली आहे.