
गडचिरोली:- पूर्वी कपडे शिवायची झाली की टेलरचे उंबरटे झिजवावे लागत होते.अन शिवलेली कपडे परत मिळवण्यासाठी किमान एक- दोन महिन्यांचा कालावधी लागत होता.पण आजच्या रेडिमेडच्या युगात मात्र टेलर व्यवसायाकडे लोकांचा कल कमी जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यातील टेलर बांधव अडचणीत सापडले आहेत.
घरात सण, उत्सव,इतर शुभकार्य असले की,लोक टेलरकडे जात होते.त्यामुळे टेलर बांधवाकडे कपडे शिवण्यासाठी गर्दी असायची.पण ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात व फॅशनेबल युगात टेलर व्यवसाय अडगळीच्या कात्रीत सापडला आहे.जसा जमाना बदलत चालला आहे.त्यानुसार फॅशनेबल कपड्यांचे फॅड वाढत आहे.त्यामुळे तरुणाई वर्ग फॅशनेबल कपड्यांच्या कडे वळू लागले आहेत. कपडे शिवण्यास लागणारा कालावधीचा विचार करता तात्काळ मिळणाऱ्या कपड्यांकडे लोक आकर्षित होऊ लागले आहेत.हा जर व्यवसाय जिवंत ठेवायचा असेल तर माणुसकीच्या नात्यातून जसे आपण पूर्वीपासून टेलरकडे कपडे शिवत होतो तसेच कपडे शिवण्यासाठी लोकांचा कल वाढला पाहिजे. तरच हा व्यवसाय टिकला जाईल अन्यथा हे टेलर बांधव अडचणीत येऊन त्यांच्या रोजी – रोटीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.