
*कु.प्रिनल बाबुलाल शेंडे एमकेसीएल ओलंपियाड मोव्हमेंट मध्ये जिल्ह्यातून दुसरी*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची मुख्यालयापासून अंदाजे दोन किमी अंतरावर असलेल्या गुटेकसा येथील प्रिनल बाबुलाल शेंडे हिने एम.के.सी.एल. ओलंपियाड मोव्हमेंट मध्ये जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकविला आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची येथे सहाव्या वर्गात शिकत आहे त्याच बरोबर संजय कम्प्युटर अँड टेक्निकल एज्युकेशन एम.एस.सी.आय.टी. सेंटर मध्ये प्रवेश घेऊन त्यांच्या मार्गदर्शनातून एम.के.सी.एल. ओलंपियाड मोव्हमेंट परीक्षेमध्ये बसून त्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकविला आहे वडील हे शेतकरी असून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण मिळावे या करिता नेहमी धळपळत असतात वडिलांचे आज मुलीने स्वप्नपूर्ती केल्यामुळे वडिलांचा मान उंचवल्याचे दिसत आहे प्रिनल ने जिद्दी व चिकाटीने मेहनत करून जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकविला आहे त्यामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची येथील शिक्षक कर्मचारी व गावकऱ्यांनी अभिनंदन केले