आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते विकास कामांचे व प्रकल्प अभियानाचे लोकार्पण
शहरातली मुख्य चौकात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
अहेरी शहरात विकास कामांचा धडाकाच
अहेरी :- नगर पंचायती अंतर्गत शुक्रवार 10 जानेवारी रोजी आमदार तथा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते नागेपल्ली येथे स्वच्छ भारत अभियान प्रकल्पाचे लोकार्पण तसेच तिथेच नवीन शेड बांधकामचे भूमिपूजन करण्यात आले.अहेरी येथील बाजार वाडीत भव्य निवारा छत लोकार्पण आणि सोबतच स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी ए. टी.एम.द्वारे वॉटर यंत्राचे लोकार्पण सोहळा करण्यात आले.तसेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय लगतच्या दानशूर चौकात आणि बस डेपो येथे स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ए. टी.एम. यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी शहरात विकास कामांचा धडाकाच लावला आहे. यावेळी अहेरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, मुख्याधिकारी गणेश शहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, नगर सेवक विलास सिडाम, महेश बाक्केवार, विलास गलबले, नगर सेविका नौरास शेख , ज्योती सडमेक, मिनाताई ओंडरे, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे श्रीकांत मद्दीवार, लक्ष्मण येरावार, नागेश मडावी, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, सुलतान पठाण, मखमुर शेख, पितांबर कुळमेथे, राजेश्वर रंगुलवार आदी व असंख्य नागरिक उपस्थित होते.