*श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिकश्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कोरची येथे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात विद्यालय कोरची येथे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कोरची जिल्हा गडचिरोली स्व. मोरेश्वरजी फाये विज्ञान महाविद्यालय कोरची/खुणारा आणि संस्कार पब्लिक स्कूल कोरची येथे वार्षिक स्नेहसंमेलन कला क्रीडा विज्ञान महोत्सव दिनांक २/ ३ व ४ जानेवारी ला आयोजित केले या समारंभाचे समारंभाध्यक्ष वामनराव फाये अध्यक्ष शाखा समिती श्रीराम विद्यालय कोरची तसेच उद्घाटक डॉ. परशुराम खुणे पद्मश्री पुरस्कृत त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून देवराव गजभिये सेवानिवृत्त प्राचार्य तसेच विशेष अतिथी म्हणून दोषहरराव फाये सचिव कुरखेडा
हर्षलताताई भैसारे नगराध्यक्ष नगरपंचायत कोरची नंदू गोबाडे मुख्याध्यापक श्रीराम विद्यालय कोरची तबरेज जाडीया पालक शिक्षक संघ संमेलन प्रमुख प्रा.वसंत बांगरे डॉ. शैलेंद्र बिसेन नगरसेवक नगरपंचायत कोरची नंदु वैरागडे पत्रकार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला
यामध्ये बौद्धिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कबड्डी, खो-खो, क्रिकेट स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले आणि बालिका दिवस साजरा करण्यात आले स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बक्षीस वितरण व समारोप प्रा. ढोक मुख्याध्यापक आश्रम शाळा कोरची यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी विशेष अतिथी प्रा.नंदू गोबाडे प्रा.वसंत बांगरे, आनंद चौबे, आशिष अग्रवाल पुढारी न्युज जिल्हा प्रतिनिधी नंदू वैरागडे पत्रकार राहुल अंबादे पत्रकार, जितेंद्र सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला पाहुण्यांचे हस्ते विविध स्पर्धेत विजेत्यांना सशक्तिपत्रक मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी शाळेतील शिक्षक वृंद भुसारी, बाविस्कर,भानारकर,झोडे, मेश्राम, वलथरे, बावणे सौ. खोब्रागडे मॅडम प्रा. बांडे प्रा.ठाकरे प्रा.अतुल झोडे प्रा. चेतन वाघाडे प्रा. भांडारकर हरिश्चंद्र डोंबले बाबू कोटांगले बाबू शाळेतील सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी सहभागी झाले कार्यक्रमाचे संचालन देवदास हटवार यांनी केले सायंकाळी स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांनी सहकार्य केले