छत्तीसगड/बिजापूर:- आयईडी स्फोटावर मुख्यमंत्री विष्णू देव साय म्हणाले, छत्तीसगड मधील विजापूरच्या कुत्रू येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 8 जवान आणि एक चालक शहीद झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना बळ देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नक्षलवादी हतबल आहेत आणि त्यामुळेच ते अशी भ्याड कृत्ये करत आहेत. जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. नक्षलवाद संपवण्याचा आमचा लढा जोरदार सुरू राहील. असे त्यांनी म्हटले आहे.