
एट्टापली येथे तालुकास्तरीय क्रीडा संमेलन संपन्न
बातमीदार: राकेश तेलकुंटलवार एटापल्ली
अहेरी:-
पचायत समिती एटापल्ली अंतर्गत तालुका स्तरीय शालेय बाल कला व क्रीडा सम्मेलन दिनांक 2 जानेवारी ते 4 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा परिषद हायस्कुल एटापल्ली च्या मैदाना पार पाडले.
मा.तनुश्री धर्मरावबाबा आत्राम सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी क्रीडा सम्मेलनाचे उद्घाटन केले.उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉक्टर आदिनाथ आंधळे गटविकास अधिकारी एटापल्ली हे होते.
या क्रीडा सम्मेलनात कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल, रिले असे सांघिक खेळ व वैयक्तिक स्पर्धा, बुद्धी बळ असे क्रीडा प्रकार प्राथमिक/ माध्यमिक मुले व मुलींचे घेण्यात आले.
या क्रीडा सम्मेलन मध्ये प्राथमिक गटात सुरजागड केंद्र तर माध्यमिक गटात एटापल्ली केंद्र नी प्राविण्य चषक पटकविला.सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिक गटात बुर्गी केंद्रानी बाजी मारली तर माध्यमिक गटात एटापल्ली केंद्रानी समुह नृत्य, एकल नृत्यात प्रथम क्रमांक पटकाविला तर समुह गीतात बुर्गी केंद्र विजेता ठरला.
बक्षिस वितरण मा.निखिल कुमरे,डा.सचिन कन्नाके, राकेश तेलकुंटवार ,देवानंद बुद्धावार, पि.ई.झाडे प्राचार्य यांचे हस्ते वितरण करण्यात आले. क्रीडा सम्मेलन च्या यशस्वीते साठी श्री निखिल कुमरे गट शिक्षणाधिकारी, विनायक पुरकलवार विस्तार अधिकारी बिट एटापल्ली कु.ए.डी.बर्लावार केंद्र प्रमुख एटापल्ली, श्री डी.एम.पुंगाटी केंद्र प्रमुख गेदा, श्री पी.एस.करमे केंद्र प्रमुख कचलेर,सर्व केंद्र प्रमुख, बि.आर.सी.एटापल्ली सर्व कर्मचारी ,शिक्षक – मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. क्रीडा सम्मेलनाचे सुत्र संचालन श्री विश्वनाथ वेलादी व त्रिमूर्ती भिसे यांनी केले.