*कोरची तालुक्यातील कोचीनारा येथे एका इसमाने गळफास लावून केली आत्महत्या*
जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची
*कोरची :-* तालुका मुख्यालयापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीनारा येथे किशोर बघवा (वय 40) या इसमाने स्वतःच्या घराच्या आंगणात असलेल्या आंबाच्या झाडात गळफास लावून आत्महत्या केली
आज सकाळी सुमारे 5 च्या दरम्यान किशोर बघवा यांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. मुख्य म्हणजे मागील काही दिवसांपासून किशोर याच्यावर कर्जाचे ओझे वाढले होते यामुळे किशोर बघवा हे मागील काही दिवसांपासून तणावात होते अशी माहिती किशोर यांच्या घरातील सदस्यांनी दिली
रोजी मजुरी करून आपला उदर निर्वाह करणारे किशोर बघवा यांच्यावर कर्जाचा बोझा वाढला होता म्हणून किशोर बघवा यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवीला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन कोरची चे प्रभारी अधिकारी शैलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे