*पितृछाया कला कनिष्ठ महाविद्यालय बोटेकसा येथे सावित्रीबाई फुले जयंती तथा स्व. डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची जयंती साजरी*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आज 3 जानेवारीला पितृछाया कला कनिष्ठ महाविद्यालय बोटेकसा येथे सावित्रीबाई फुले जयंती त्याचप्रमाणे पितृछाया कला कनिष्ठ महाविद्यालय यांचे संकल्पक स्व. डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाप्रसंगी बहुउद्देशीय आदिवासी विकास संस्था कोरची या संस्थेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल हे अध्यक्षस्थानी होते तर विशेष अतिथी म्हणून जितेंद्र सहारे होते त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य देवानंद दरवडे, प्रा. रामलाल वट्टी व फेब्रुवारी/ मार्च 2024 च्या वर्ग बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 71.40% गुण घेऊन प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. यमुना बीसराम सारवा ही सुद्धा कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व स्व. डॉ. अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन अर्चन करून करण्यात आली यानंतर पितृछाया कला कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेली विद्यार्थिनी यमुना सारवा हिला आशिष अग्रवाल यांच्याकडून 1100 रू.रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. एम.वट्टी यांनी केले संचालन वर्ग अकरावी कलाचा विद्यार्थी अरुण कुमरे यांनी केले सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकले तर आभार प्रदर्शन वर्ग बारावी कला ची वर्ग प्रतिनिधी कु. लक्ष्मी मडावी हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.