![](https://indravatividharbhtimes.in/wp-content/uploads/2024/11/IMG-20241123-WA0235-1024x768.jpg)
निलिमा बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
गडचिरोली:- गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवून भाजपाच्या यशाचा झेंडा फडकवला. या ऐतिहासिक विजयाने गडचिरोली शहरात विजयी जल्लोष रॅली काढण्यात आली.
या रॅलीत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात जल्लोषात रॅली निघाली.
विजयाचा जल्लोष
डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाच्या निमित्ताने गडचिरोली शहरात फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटप आणि विजयी रॅलीने जल्लोष साजरा करण्यात आला. आयटीआय चौक, बाजार चौक, हनुमान वॉर्ड, सराफा लाईन, गुजरी चौक, गांधी चौक तसेच भाजपा जनसंपर्क कार्यालय यांसारख्या भागांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवत कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.