नागपूर:- अपार कार्ड ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 12 अंकी क्रमांक दिला जाईल. त्याच्या मदतीने भविष्यात त्यांची शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिकाअधिक शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. हे अपार कार्ड प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले जाईल.याद्वारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, त्यांच्या गुणपत्रिका इत्यादी संबंधित अपार आयडीमध्ये जतन केल्या जातील. डिजीलॉकरच्या मदतीने सर्व शैक्षणिक नोंदी पाहता येतात. या प्रणालीमुळे गळतीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात मदत होईल. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शाळांमधून गळतीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात मदत होईल.
नवोदय विद्यालयातील ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना अपार आयडी जारी.
Apar ID फक्त U Dice पोर्टलद्वारेच तयार करता येईल. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना अपार आयडी जारी करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येणार आहे.
अपार कार्ड बनवण्याकरिता आधार कार्ड आवश्यक
अपार कार्ड’ बनवण्यासाठी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचे ‘डिजिलॉकर’ वर खाते असावे. त्या आधारे विद्यार्थ्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नोंदणीनंतर संबंधित शाळा आणि महाविद्यालयांकडून ‘अपार कार्ड’ दिले जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घेतली जाणार आहे.